बांधावरून संबंध खराब करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:14+5:302021-02-05T08:25:14+5:30
दिंद्रुड : आजकाल किरकोळ कारणावरून समाजातील वातावरण दूषित होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन करत ...

बांधावरून संबंध खराब करू नका
दिंद्रुड : आजकाल किरकोळ कारणावरून समाजातील वातावरण दूषित होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन करत शेतातील बांधावरून आपापसातील संबंध खराब करू नका, असा मोलाचा सल्ला जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिला.
पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिंद्रुड पोलीस हद्दीतील तंटामुक्ती अध्यक्ष, शांतता समिती, ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांची बैठक घेत कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी मार्गदर्शन करत संवाद साधला. सर्व पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. ते म्हणाले, जनतेसाठी पोलीस हा सदोदीत काम करतच असतो. मात्र जनतेनेही पोलिसांना सहकार्य करत व आपापल्या गावातील शांततेला टिकवण्यासाठी अग्रक्रमाने पुढे आले पाहिजे. बांधावरची भांडणे बांधावरच मिटली पाहिजेत, खोटे गुन्हे दाखल न होण्याची काळजी घेतली पाहिजे, जात, धर्म या नावाखाली पितळ पांढरे करणाऱ्यांपासून सावधानता बाळगण्याचे अवाहन पोलीस अधीक्षकांनी या प्रसंगी केले. दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनि. अनिल गव्हाणकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचलन बंडू खांडेकर यांनी केले, तर फौजदार विठ्ठल शिंदे यांनी आभार मानले. दिंद्रुड, नित्रुड, कासारी, मोगरा, भोपा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी या बैठकीत पोलीस अधीक्षक आर. राजा यांचा सत्कार केला.