दानपत्र एकीकडे अन् शाळा बांधकाम दुसरीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:31 IST2021-03-07T04:31:23+5:302021-03-07T04:31:23+5:30
केज : तालुक्यातील दहिफळ वडमावली येथील जि.प.प्रा.शाळा हरगळवस्ती येथे शाळाखोलीचे बांधकाम एकीकडे आणि दानपत्र दुसरीकडे असा प्रताप केजच्या ...

दानपत्र एकीकडे अन् शाळा बांधकाम दुसरीकडे
केज : तालुक्यातील दहिफळ वडमावली येथील जि.प.प्रा.शाळा हरगळवस्ती येथे शाळाखोलीचे बांधकाम एकीकडे आणि दानपत्र दुसरीकडे असा प्रताप केजच्या जि. प. बांधकाम उपविभागाने केला असून या बांधकामाला शालेय समितीने तीव्र विरोध केला आहे. तरीही हे बांधकाम सुरुच आहे. हे बांधकाम गावापासून १ किलोमीटर अंतरावर डोंगरावर असल्याने ते तात्काळ रद्द करून दानपत्र घेतलेल्या ठिकाणीच करावे, अशी मागणी शालेय समितीचे अध्यक्ष महावीर ठोंबरे व राजाभाऊ हंगे यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील हरगळ वस्ती येथे शाळाखोली बांधकामासाठी १९ जानेवारी२०१५ मध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून जागा उपलब्ध करून देण्यासंबंधी पत्र देण्यात आले होते. त्यानंतर २० जानेवारी २०१५ रोजी हरगळ वस्तीशाळेसाठी ११ गुंठे जागेची रजिस्ट्री दानपत्र करण्यात आले. निधी उपलब्ध होताच बांधकाम सुरू करण्याबाबत ग्रामस्थांना सांगितले. दरम्यान, शाळाखोली बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. केजचे गटशिक्षणाधिकारी कार्यालय व जि. प. बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधित गुत्तेदाराने हाताशी धरून गावातील शालेय शिक्षण समितीचा विरोध असलेल्या १ किलोमीटरवर शाळा खोलीच्या बांधकामाला सुरुवात केली असून हे बांधकाम तात्काळ स्थगित करून दानपत्र मिळालेल्या जागेवरच शाळाखोलीचे बांधकाम करावे, अशी मागणी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष महावीर ठोंबरे व राजाभाऊ हंगे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे
दरम्यान, रजिस्ट्री दान नसलेल्या ठिकाणी व शालेय शिक्षण समितीचा विरोध असतानाही केजच्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाने व गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने शाळा बांधकामाला परवानगी दिलीच कशी ? असा सवाल केला जात आहे. शाळाखोलीच्या या अवैध बांधकामास तात्काळ स्थगिती देऊन रजिस्ट्री दान झालेल्या ठिकाणीच शाळाखोलीचे बांधकाम करण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीने आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
===Photopath===
060321\deepak naikwade_img-20210306-wa0034_14.jpg~060321\deepak naikwade_img-20210306-wa0035_14.jpg