रोटरी स्थापना दिनानिमित्त स्वारातीच्या कोविड सेंटरला सव्वा लाखाच्या साहित्याची मदत - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:46 IST2021-02-26T04:46:34+5:302021-02-26T04:46:34+5:30

२३ फेब्रुवारी हा दिवस जगभर रोटरी क्लबद्वारा रोटरी डे (स्थापना दिवस) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जगभर विविध उपक्रम ...

Donation of Rs. | रोटरी स्थापना दिनानिमित्त स्वारातीच्या कोविड सेंटरला सव्वा लाखाच्या साहित्याची मदत - A

रोटरी स्थापना दिनानिमित्त स्वारातीच्या कोविड सेंटरला सव्वा लाखाच्या साहित्याची मदत - A

२३ फेब्रुवारी हा दिवस जगभर रोटरी क्लबद्वारा रोटरी डे (स्थापना दिवस) म्हणून साजरा केला जातो.

यानिमित्ताने जगभर विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीद्वारा आज स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये १ लाख २० हजार रुपयांच्या आवश्यक त्या वस्तू भेट देण्यात आल्या. तसेच रुग्णालयात उपचारासाठी विविध वॉर्डात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना वाॅर्डबाहेर परिसरात बसण्यासाठी म्हणून २० सिमेंट बेंचही देण्यात आले. तसेच शहरातील दोन गरजू महिलांना दोन शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात प्रभारी अधिष्ठाता डॉ. संदीप निळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून औषधी विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, रुग्णालय अधीक्षक डॉ. राकेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश आब्दागिरे, अधिपरिचारिका उषा भताने, उपअधीक्षक डॉ. विश्वजीत पवार, रोटरीचे सचिव कल्याण काळे, व इतर सदस्यांच्या उपस्थितीत ही मदत देण्यात आली. कोविड केअर हॉस्पिटलला २० वॉल हँगर, २ कमोड चेअर, ३५ डस्ट बिन, १० प्लास्टिक खुर्च्या, १५ बकेट्स, ६ वॉल क्लॉक, १ औषध बॉक्स, १ गोळ्यांसाठी बॉक्स, १ इंजेक्शन कॅरियर, ५ ऑक्सिमीटर, २ थर्मल गन असे एकूण असे एकूण १ लाख २० हजार रुपयांचे साहित्य देण्यात आले.

या वेळी सर्व पाहुण्यांचे स्वागत रोटरी क्लबचे सचिव कल्याण काळे, सदस्य स्वप्निल परदेशी, गोरख मुंडे, गणेश राऊत, प्रदीप झरकर, रोहिणी पाठक, प्रवीण चोकडा, शकील शेख, राम सारडा, जगदीश जाजू, सचिन बेंबडे या सदस्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्रांतपाल संतोष मोहिते यांनी केले.

यांनी केले सहकार्य...!

स्वाराती कोविड केअर सेंटर व रुग्णालय परिसरात देण्यात आलेल्या साहित्यासाठी सयाजी गायकवाड, राजा ठाकूर, मोईन शेख, कचरू सारडा, नरेंद्र ठाकूर, सुहास मोहिते, संजय बुरांडे, चौधरी विलास, अकोलकर महेश, पिंटू पटाईत, डॉ. निशिकांत पाचेगावकर, गोपाळ पारीख यांनी सहकार्य केले.

Web Title: Donation of Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.