संकल्प निरोगी अभियानात तपासणीसह करा रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:21 IST2021-07-22T04:21:13+5:302021-07-22T04:21:13+5:30
गुरुवारी शिबिर : प्रत्येक आरोग्य संस्थेत तपासणीसह ११ ठिकाणी रक्तदानाचे नियोजन बीड : कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष झाले. हाच ...

संकल्प निरोगी अभियानात तपासणीसह करा रक्तदान
गुरुवारी शिबिर : प्रत्येक आरोग्य संस्थेत तपासणीसह ११ ठिकाणी रक्तदानाचे नियोजन
बीड : कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष झाले. हाच धागा पकडून आरोग्य विभागाकडून ''''संकल्प निरोगी अभियान'''' राबविले जात आहे. यासाठी गुरुवारी जिल्हाभरातील आरोग्य संस्थांमध्ये तपासणी केली जाणार आहे, तसेच ११ ठिकाणी रक्तदान करण्याची व्यवस्था केली आहे. रक्तदान करण्यासह तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
राज्यात कोरोनामुळे इतर किरकोळ व गंभीर आजारांकडे दुर्लक्ष झाले. ही बाब आरोग्य मंत्री राजेश टाेपे यांच्या लक्षात आली. त्यांनी आरोग्य विभागाची बैठक घेत ''''संकल्प निरोगी अभियान'''' राबविण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे लातूरचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांच्या सूचनेवरून बीडमध्ये जिल्हा रुग्णालयासह इतर आरोग्य संस्थांमध्ये तपासणी शिबिर ठेवले आहे. तसेच बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, चिंचवण, पाटोदा, आष्टी, वीडा, लोखंडी सावरगाव, केज, परळी येथील शासकीय आरोग्य संस्थेत रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ. सुखदेव राठोड यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा
शासकीय रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा आहे. मंगळवारी रक्तगट ए च्या ६, बी ३, ओ २० आणि एबी २ एवढ्याच बॅग शिल्लक होत्या. रक्ताचा तुटवडा असल्यानेच हे शिबिर घेतले जात असल्याचे रक्तपेढीच्या वतीने सांगण्यात आले.