रक्तदान केले आता झाडही लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:42+5:302021-06-18T04:23:42+5:30

माजलगाव : जिल्ह्यातील रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून मनसेच्या वतीने आयोजित शिबिरात ५३ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी ...

Donate blood, now plant the tree | रक्तदान केले आता झाडही लावा

रक्तदान केले आता झाडही लावा

माजलगाव : जिल्ह्यातील रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून मनसेच्या वतीने आयोजित शिबिरात ५३ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान करणाऱ्यांना वृक्षरोप भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते जगदीश साखरे यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष पाटील ,पो.कॉ. राज ससाने , मनसे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे , राजेंद्र मोटे, मारुती दुंनगे , उपाध्यक्ष गणेश वाघमारे , महिला जिल्हाध्यक्ष रेखा अंबुरे ,उपाध्यक्ष शकुंतला घुंगासे, तुकाराम येवले , उमेश मोगरकर , ज्योतीराम पांढरपोटे,आमर साळवे , उत्तमराव जाधव , भगीरथ तोडकरी , अविनाश जाधव व मधुर रुद्रवार आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे विद्यार्थी आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गोविंद देशमाने ,तुकाराम कळसाईतकर , रमेश जोगडे ,अरविंद जाधव , स्वानंद नाईक , दीपक तोडकरी , निखिल धोपटे , कृष्णा मालपाणी , योगेश राजमाने , शंतनु डहाळे आदींनी प्रयत्न केले.

===Photopath===

170621\17_2_bed_3_17062021_14.jpg

===Caption===

रक्तदान शिबीर

Web Title: Donate blood, now plant the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.