डॉक्टरचे घर फोडून दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:38 IST2021-08-24T04:38:02+5:302021-08-24T04:38:02+5:30

शहरातील नवीन सरस्वती विद्यालय परिसरातील माउलीनगर येथे चोरट्यांनी डॉक्टरच्या घरात शिरून दागिने व एक एलईडी लंपास केला. ...

The doctor's house was broken into | डॉक्टरचे घर फोडून दागिने लंपास

डॉक्टरचे घर फोडून दागिने लंपास

शहरातील नवीन सरस्वती विद्यालय परिसरातील माउलीनगर येथे चोरट्यांनी डॉक्टरच्या घरात शिरून दागिने व एक एलईडी लंपास केला. सोमवारी (दि.२३) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

शहरातील माउलीनगर येथे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मनीषा अनिल झोडगे यांचे घर आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास झोडगे कुटुंबीय झोपेत असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. १२ हजार रुपये किमतीचा एलईडी व तसेच सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. डॉ. मनीषा झोडगे यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद नोंदवली.

दरम्यान, घटनास्थळी उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यासह शिवाजीनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक नितीन पाटील तसेच डी. बी. पथकातील अंमलदार फेरोज पठाण, विष्णू चव्हाण, तुषार गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली.

...

230821\23bed_13_23082021_14.jpg

घरफोडी

Web Title: The doctor's house was broken into