गवंडी कामगाराचा मुलगा होणार डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:21 IST2021-02-05T08:21:56+5:302021-02-05T08:21:56+5:30

आडस : गवंडीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे येथील राजेभाऊ गायकवाड यांचा मुलगा सुशील गायकवाड याने एमबीबीएस प्रवेशपूर्व परीक्षेत ...

The doctor will be the son of a bricklayer | गवंडी कामगाराचा मुलगा होणार डॉक्टर

गवंडी कामगाराचा मुलगा होणार डॉक्टर

आडस : गवंडीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे येथील राजेभाऊ गायकवाड यांचा मुलगा सुशील गायकवाड याने एमबीबीएस प्रवेशपूर्व परीक्षेत ५२९ गुण मिळवून यश मिळविले. सुशीलचा औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शिक्षणासाठी नंबर लागला. सुशीलचे मनोबल वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी केवळ शाब्दिक प्राेत्साहन न देता आर्थिक पाठबळ देत शाबासकीची थाप दिली. ऋषिकेश आडसकर, नितीन ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य गोविंद वाघमारे,उद्योजक बाळासाहेब इंगोले, चेअरमन उद्धवराव इंगोले, काशीनाथ आकूसकर आदींनी निधी संकलन करीत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत केली. शिक्षणासाठी जाताना ग्रामस्थांच्या वतीने राजेभाऊ गायकवाड व सुशील या पितापुत्रांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऋषिकेश आडसकर, उद्धवराव इंगोले, विकास काशीद, बाळासाहेब इंगोले, बाळासाहेब ढोले, नितीन ठाकूर, प्रशांत चव्हाण, बब्रुवान ढोले, गोरख गायकवाड, सागर ठाकूर, रामदास साबळे आदी उपस्थित होते.

Web Title: The doctor will be the son of a bricklayer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.