जिवाचीवाडी येथे डॉक्टरला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:32 IST2021-05-15T04:32:55+5:302021-05-15T04:32:55+5:30
केज : पोटात दुखू लागल्याने उपचारासाठी डॉक्टरकडे आलेल्या रुग्णाने व त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरास मारहाण केली. याप्रकरणी केज पोलीस ...

जिवाचीवाडी येथे डॉक्टरला मारहाण
केज : पोटात दुखू लागल्याने उपचारासाठी डॉक्टरकडे आलेल्या रुग्णाने व त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरास मारहाण केली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिवाचीवाडी येथे डॉ. दादासाहेब लिंदाजी चौरे हे खासगी वैद्यकीय व्यवसाय करतात. १३ मे रोजी रात्री ८.३० वाजण्याच्यासुमारास त्यांच्याकडे बाळू अच्युत चौरे हा पोट दुखत असल्याने उपचारासाठी आला होता. यावेळी डॉक्टर जेवण करत असल्याने त्यांनी जेवण झाल्यानंतर पाहतो, असे सांगितल्याने याचा राग आल्याने डॉ. दादासाहेब लिंदाजी चौरे यांना बाळू अच्युत चौरे याने हातात सोबत आणलेला लोखंडी गज डोक्यात मारून डोके फोडून दुखापत केली. तर, सोबत आलेल्या राजाभाऊ धोंडीबा चौरे व अनिल मधुकर चौरे यांनी हातातील दगडाने पाठीत मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दादासाहेब लिंदाजी चौरे यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सोनवणे करत आहेत.