शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

संपूर्ण प्लास्टिक बंदी नको; व्यापारी महासंघाच्या वतीने बीडमध्ये मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:26 IST

शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या निर्णयामध्ये सुधारणा करावी आणि छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बुधवारी व्यापारी महासंघातर्फे बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या निर्णयामध्ये सुधारणा करावी आणि छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बुधवारी व्यापारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

राज्य सरकारने संपूर्ण प्लास्टीक बंदीचा निर्णय घेतला आहे. निर्णय घेताना राज्यातील व्यापारी महासंघ अथवा संघटनेशी चर्चा केली नाही, त्यांचे मत विचारात घेतले नाही. या निर्णयामुळे किराणा, हॉटेल, धान्य, स्विट होम, फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, महिला गृह उद्योग, गारमेंट इंडस्ट्रीज, साडी-ड्रेस मटेरिअल, स्टेशनरी, कटलरी, बेकरी चालक व इतर क्षेत्रातील घटकांवर दूरगामी परिणाम होणार असल्याचे व्यापारी महासंघाचे म्हणणे आहे.

हा निर्णय एकतर्फी असल्याच्या निषेधार्थ येथील डीपी रोडवरील एसबीआय बॅँकेपासून जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी, शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. अरुण बरकसे, संतोष टवाणी, सूरज लोहिया, बाळू सोहनी, मन्मथअप्पा हेरकर, विनोद ललवाणी, अमित सिकची, शकील भाई नसीर भाई, प्रितेश ललवाणी, कैलास जाजू, प्रमोद निनाळ, राजू तापडिया, दत्तप्रसाद तापडिया, वर्धमान खिंवसरा, राजेश कासट, महेश सिकची, राजेश राठी, नागेश मिटकरी, नंदलाल मानधने, गंगाबिशन करवा, भगीरथ चरखा, बालाप्रसाद जाजू, जयनारायण अग्रवाल, संजय बरगे (गेवराई), सुरेंद्र रुपकर, विनायक मुळे, विजयकुमार अंडील, किसनराव माने (वडवणी), माजलगावचे संतोष आबड, अनंत रुद्रवार, धनराज बंब, सुरेंद्र रेदासनी, अंबाजोगाईचे ईश्वर लोहिया, दत्तप्रसाद लोहिया, दामोदर भांगडीया आदी व्यापाºयांचा मोर्चात सहभाग होता. आदर्श मार्केट व्यापरी संघासह इतर संघटनांनीही मोर्चाला पाठिंबा दिला. व्यापाºयांनी काळ्या फिती लावून शासनाच्या निर्णयाला विरोध दर्शविला.

कमी जाडीवर बंदी घालाप्रदूषण न होणाºया प्लास्टीकवर बंदी नको, सरकारने निर्णयाआधी व्यापाºयांना विचारात घेणे महत्वाचे होते असे व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शांतीलाल पटेल म्हणाले. पर्यावरणाच्या नावाखाली बंदी अन्यायकारक असून प्लास्टिक क्षेत्रातील अडीच हजार कारखाने आहेत. त्यामुळे बंदीनंतर एक लाख कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगवर बंदी घालावी अशी शासनाकडे मागणी करत महाराष्टÑ चेम्बर आॅफ कॉमर्सचे माजी उपाध्यक्ष सत्यनारायण लाहोटी यांनी प्लास्टिक कचरा विल्हेवाटीवरही व्यापाºयांनी लक्ष द्यावे असे आवाहन केले.

परिणामांची दिली माहितीजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यावर प्लास्टीक डिस्पोजल व्यापारी संघटनेचे अमित सिकची यांनी प्लास्टिकवर संपूर्ण बंदी कशी अयोग्य आहे. विविध घटकांवरील परिणाम, शासन महसूलचे नुकसान याबाबत माहिती दिली. कागद निर्मितीसाठी झाडांचा वापर करावा लागेल त्यामुळे पर्यावरणाचेच नुकसान होईल. प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट २०१६ लक्षात घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

असे होते घोषफलकप्लास्टिक मित्र आहे, शत्रू नव्हे, प्लास्टीकची विल्हेवाट योग्यरित्या लावा, जागरूक नागरिक बना, प्लास्टीक रस्त्यावर फेकू नका, पाणी वाचवा, डिस्पोजेबल वापरा, जे बेरोजगार होणार त्यांना न्याय द्या, प्लास्टिक वापरा झाडे वाचवा, तुमच्या भांडणात माझा काय दोष? (५१ मायक्रॉन), आधी पर्याय द्या, मग बंदी घाला इ. घोषवाक्यांचे फलक मोर्चेकरी व्यापाºयांच्या हाती होते.

टॅग्स :BeedबीडPlastic banप्लॅस्टिक बंदीMarathwadaमराठवाडाagitationआंदोलन