शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'हताश होऊ नका, हे शेतकऱ्यांचे सरकार'; खा. प्रीतम मुंडेंचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 15:54 IST

सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. प्रीतम मुंडे यांनी दिले.

- अविनाश कदमआष्टी (बीड) : तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून मागिल १० ते १५ दिवसांपासून जोरदार कोसळधाराने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले. अद्याप ही आष्टी तालुक्याची पाठ सोडायला पाऊस तयार नाही पांढरी, सोलेवाडी, आष्टा महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जमिन खरडून पिके वाहून गेली आहेत. शेत जलमय झाले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या नुकसानीची खा. प्रीतम मुंडे यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांनी हताश न होता आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा धीर देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खा. मुंडे यांनी सांत्वन केले. 

तालुक्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले असून पांढरी, सोलेवाडी येथील नदीला पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या जमिनी व चांगल्या प्रकारच्या जमिनी ही खरडून गेल्या हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून संकटात सापडले आहेत.नदी नाल्या दुथडी भरून वाहत आहेत.पिके पाण्यात आहेत.दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी आहेत. बळीराजाचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागाची खा‌. प्रीतम मुंडे यांनी आज दुपारी १२ दरम्यान पांढरी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतातील सोयाबीनची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला व‌ तुटलेल्या पुलाची पाहणी केली. तसेच नुकसानीचे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार विनोद गुंडमवार यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. मुंडे यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात मा.आ. भीमराव धोंडे, विजय गोल्हार, अजय धोंडे, सागर धस, अमोल तरटे, पं.स.सदस्य रावसाहेब लोखंडे,दिलीप हंबर्डे, उपविभागीय अधिकारी  कुदळे साहेब, तहसिलदार विनोद गुंड्डमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, कृषी अधिकारी गोरख तरटे, युवराज वायबसे,रघुनाथ शिंदे, तात्या कदम , केशव बांगर,सरपंच राहुल काकडे,सुधिर पठाडे, जालिंदर वांढरे, बाळासाहेब नागरगोजे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची सांत्वन पर भेटआष्टी तालुक्यातील पांढरी येथील दादासाहेब वांढरे या शेतकऱ्यांने अतिवृष्टीने नुकसान झाल्याने आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबांची खा. मुंडे यांनी सांत्वन पर भेट घेऊन शेतक-यांनो हताश होऊ नका हे सरकार शेतकऱ्यांचे असून तुमच्या पाठीशी आहे. शेतक-यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन शेतकऱ्यांना केले.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसPritam Mundeप्रीतम मुंडेagricultureशेती