शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'माझी इच्छा पूर्ण कर...'; सहकारी पोलीस महिलेस ब्लॅकमेल करणारा अंमलदार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 14:04 IST

माझी इच्छा पूर्ण कर, तुला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही

बीड : माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, अशी धमकी देत महिला अंमलदारास अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या अंमलदारास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी १३ सप्टेंबरला निलंबनाचा दणका दिला. माजलगाव येथे १० सप्टेंबरला ही घटना घडली होती.

हरिश्चंद्र खताळ, असे निलंबित अंमलदाराचे नाव आहे. हरिश्चंद्र खताळ व पीडित महिला अंमलदार ग्रामीण ठाण्यात कार्यरत आहेत. २०२१ पासून ते २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत हरिश्चंद्र खताळ याने व्हॉटसअॅप मेसेज करून या महिलेस त्रास दिला. ८ सप्टेंबरला रात्री घरी येऊन माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, असे म्हणत धमकावून विनयभंग केला होता. त्यानंतर त्याची पोलीस पत्नी शिवकन्या निंगुळे हिने पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक नाही तर तुझ्यावर, तुझ्या नातेवाईकांवर ३०६ नुसार गुन्हा दाखल करून तुझी बदनामी करीन, तुला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती.

पीडित महिला अंमलदाराच्या फिर्यादीवरून पो.कॉ. हरिश्चंद्र खताळ व पो.ना. शिवकन्या निंगुळे या दाम्पत्यावर शहर ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली होती. गैरवर्तन केल्याचा ठपका ठेऊन पो.कॉ. हरिश्चंद्र खताळवर निलंबनाची कारवाई केली. १३ रोजी याबाबतचे आदेश काढल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस