जिल्हा बैठकीत शेतकरी आत्महत्येची १६ प्रकरणे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST2021-06-25T04:24:18+5:302021-06-25T04:24:18+5:30
बीड : शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १६ प्रकरणे मंजूर करण्यात आली. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या ...

जिल्हा बैठकीत शेतकरी आत्महत्येची १६ प्रकरणे मंजूर
बीड : शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १६ प्रकरणे मंजूर करण्यात आली. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली २३ जून रोजी दुपारी ही बैठक झाली. या बैठकीत समितीसमोर शेतकरी आत्महत्येची २३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रकरणे नापिकी, कर्जबाजारीपणामुळे पात्र करण्यात आली. तसेच ४ प्रकरणे नामंजूर करण्यात आली असून ३ प्रकरणात फेरचौकशीचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
गुरुवारी झालेल्या बैठकीत अभिजित बाबासाहेब शिंदे, नेकनूर, सतीश जीवन शेळके, वांगी, ता. बीड, दिनकर सखाराम वंजारे, कामखेडा, ता. बीड, देविदास परमेश्वर पोकळे, बेलगाव, ता. आष्टी, सखाराम तुकाराम पाचपुते, देविनिमगाव, ता. आष्टी, राजाभाऊ मधुकर पवार, मारोतीचीवाडी, ता. गेवराई, आप्पासाहेब निवृत्ती सानप, खडकी, ता. गेवराई, रामेश्वर राजेंद्र जाधव, सुलतानपूर, ता. गेवराई, भास्कर शंकर मुंडे, मुंडेवाडी, ता. केज, मधुकर रंगनाथ सत्वधर, केवड, ता. केजराजेभाऊ अशोक कुकडे, गंगामसला, ता. माजलगाव, अरुण व्यंकटी पन्हाळे, नागडगाव, ता. माजलगाव, युवराज गोविंद वांढरे, भोपा, ता. धारूर, भगवान दशरथ चव्हाण, आवरगाव, ता. धारूर, बापू देवराव जाधव, जाटनांदूर तहत चाहूरवाडी, ता. शिरूर, बंडू अर्जुन मदने, अर्धपिंपरी, ता. गेवराई या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.