यमाई गौरव पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:43+5:302021-02-05T08:24:43+5:30
फोटो गेवराई : तालुक्यातील जातेगाव येथील जागृत देवस्थान यमादेवी देवस्थानच्या वतीने यमाई गौरव पुरस्काराचे वितरण गुरुवारी करण्यात आले. ...

यमाई गौरव पुरस्काराचे वितरण
फोटो
गेवराई : तालुक्यातील जातेगाव येथील जागृत देवस्थान यमादेवी देवस्थानच्या वतीने यमाई गौरव पुरस्काराचे वितरण गुरुवारी करण्यात आले.
जातेगाव येथील यमादेवी मंदिर परिसरात अखिल भारतीय छावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील, भास्कर सोळंके, दत्ता वाघमारे, डाॅ. पल्लवी झोडपे, डाॅ. विलास चव्हाण, डाॅ. रामेश्वर चव्हाण, डाॅ. उद्धव घोडके, डाॅ. जीवन राठोड, डाॅ. राजपाल सोनवणे, डाॅ. संभाजी जाधव, पोलीस लेखनिक श्रीकृष्ण वडकर, सहशिक्षक विष्णू सायंबर, छाया मुळे, रसूल शेख, राधेश्याम चव्हाण, सुनील राऊत आदींना यमाई गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे सचिव डाॅ. रत्नाकर चव्हाण, अच्युत आरदड, माजी सरपंच बाबूराव चव्हाण, कल्याण चव्हाण, डाॅ. इंदर चव्हाण, राधेश्याम लेंडाळ, राधेश्याम धोंडरे, यात्रा महोत्सव समिती अध्यक्ष प्रदीप चव्हाण, सतीश पवार, बाळासाहेब चव्हाण, गोरख चव्हाण उपस्थित होते. प्रास्ताविक कल्याण चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन गोपाल चव्हाण यांनी केले.