गणवेश वाटप, बक्षीस वितरण अन् सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:56+5:302021-02-05T08:25:56+5:30
पाटोदा : येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ७२ वा प्रजासत्ताक दिन सोहळा ...

गणवेश वाटप, बक्षीस वितरण अन् सत्कार
पाटोदा : येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ७२ वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बळिराम राख होते. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रामकृष्ण रंधवे बापू उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पमाल्यार्पण व तद्नंतर ध्वजारोहण झाले. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डॉ. किशोर मचाले, पदव्युत्तर विभाग संचालक प्रा. डॉ. मनोजकुमार प्रकाश, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. नंदकुमार पटाईत, पर्यवेक्षक प्रा. रमेश टाकणखार, प्रा. डॉ. तानाजी आगळे, कार्यालय अधीक्षक अशोक पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रा. बलराज अविळे, प्रा. प्रदीप मांजरे यांनी देशभक्ती गीते सादर केली. गत शैक्षणिक वर्षात विविध क्रीडा प्रकारांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडूंचा सत्कारही झाला. प्रा. डॉ. तानाजी आगळे यांचा राज्य खो-खो असोसिएशनच्या सचिवपदी तर प्रा. चित्रा आगळे यांचा राष्ट्रीय निवड समिती सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मिल्लिया महाविद्यालयात आयोजित पाचव्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रे वाटप करण्यात आली. मराठी विभागाच्यावतीने दर्पणदिनानिमित्त आयोजित निबंध लेखन स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना ग्रंथस्वरूपात पारितोषिके देण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन याप्रसंगी संपन्न झाले. त्यानंतर वनस्पतीशास्त्र, गणित, गृहशास्त्र, प्राणिशास्त्र, हिंदी, भौतिकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र तसेच संस्कृत विभागांच्यावतीने भित्तिपत्रकांचे विमोचन झाले.
कार्यक्रमाचे संयुक्त सूत्रसंचालन प्रा. डॉ. पल्लवी इरलापल्ले व प्रा. कुशाबा साळुंके यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. हमराज उइके यांनी केले.
असे झाले कार्यक्रम महाविद्यालयाच्या सावित्रीबाई फुले महिला सक्षमीकरण व अंतर्गत तक्रार समितीच्यावतीने विद्यार्थिनींना ड्रेसमटेरियल वाटप झाले. याच समितीच्या वतीने आयोजित वक्तृत्व व निबंध स्पर्धेत विविध पारितोषिके पटकावणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.