निराधारांना किराणा साहित्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:35+5:302021-08-18T04:39:35+5:30
अंबाजोगाई : दात्यांच्या अर्थसाहाय्यातून ८० वृध्द निराधारांना मान्यवरांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ...

निराधारांना किराणा साहित्याचे वितरण
अंबाजोगाई : दात्यांच्या अर्थसाहाय्यातून ८० वृध्द निराधारांना मान्यवरांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वाराती रुग्णालयातील डॉ. विशाल लेडे, डॉ. नागेश अब्दागिरे, डॉ. सचिन काळे, डॉ. संदीपान चव्हाण, डॉ. महेंद्र जाधव, नगरसेवक दिनेश भराडिया, रामेश्वर ढेले, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, संभाजी सावळकर, अरुण आसरडोहकर, राहुल देशपांडे,कल्पना लोहिया आदी उपस्थित होते.
यावेळी कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. दानशूर व्यक्तींच्या अर्थसाहाय्यातून वृध्द, अपंग, अंध, आजारग्रस्त उपेक्षितांसाठी मानवलोक सेवाभावी संस्था कार्य करते, असे सांगून इतर उपक्रमांची माहिती अनिकेत लोहिया यांनी दिली. डॉ. विशाल लेडे, डॉ. नागेश अब्दागिरे, डॉ. सचिन काळे यांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला संजना आपेट, सावित्री सागरे यांनी स्वागतगीत गायिले. श्याम सरवदे यांनी आभार मानले. दिलीप मारवाळ यांच्यासह इतरांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.