जिल्हा परिषदेच्या वतीने ५९ जणांना शेळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:12 IST2021-09-02T05:12:14+5:302021-09-02T05:12:14+5:30

माजलगाव : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने माजलगाव मतदारसंघातील पात्र एकूण ६० जणांना प्रत्येकी एक बोकड व चार ...

Distribution of goats to 59 persons on behalf of Zilla Parishad | जिल्हा परिषदेच्या वतीने ५९ जणांना शेळ्यांचे वाटप

जिल्हा परिषदेच्या वतीने ५९ जणांना शेळ्यांचे वाटप

माजलगाव : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने माजलगाव मतदारसंघातील पात्र एकूण ६० जणांना प्रत्येकी एक बोकड व चार शेळ्या वाटप आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले.

माजलगाव पंचायत समिती सभागृहात मंगळवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगराध्यक्ष शेख मंजूर, सभापती जयसिंह सोळंके, सभापती समाजकल्याण विभाग कल्याण आबुज, जि. प. सदस्य चंद्रकांत शेजूळ, प्रकाश गवते, शरद चव्हाण, लालासाहेब तिडके, औदुंबर सावंत, भागवत खुळे, बाजार समितीचे सभापती संभाजी शेजूळ, जयदत्त नरवडे, पुण्यश्लोक शेळी, मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापक लाखे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आ. सोळंके यांनी कैलास कांबळे, नवनाथ मिसाळ, परमेश्वर भूतकर यांना प्रत्येकी एक बोकड व ४ शेळ्यांचे वाटप केले.

010921\purusttam karva_img-20210901-wa0021_14.jpg

जिल्हा परिषदेच्या वतीने ५९ जणांना शेळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश सोळंके उपस्थित होते.

Web Title: Distribution of goats to 59 persons on behalf of Zilla Parishad