शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात टँकरद्वारे होतोय दुषित पाणी पुरवठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 16:58 IST

पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांतील पाणीसाठा घटला 

बीड : जिल्ह्यात भीषण टंचाई असल्यामुळे ८९३ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता. त्यापैकी ८२४ टँकर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करतात. मात्र, मागील काही दिवसांपासून दुषित व गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच टँकरच्या खेपा नियमांनूसार होत नसल्याचे नागरिकांमधून केली जात आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिमुळे विहीर, बोअर आटले आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये टँकरच्या पाण्यावरच दैनंदिन गरजा नागरिकांना भागवाव्या लागत आहेत. मात्र, टँकरद्वरे पाणी पुरवठा करण्यासाठी जे उद्भव देण्यात आले आहेत. त्या ठिकाणची पाणी पातळी देखील खालावत चालली असल्यामुळे अनेक वेळा थेट तळ््यातून पाणी  काही टँकर चालक पाणी भरत असल्यामुळे त्यांच्याकडून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. नागरिकांना पार्याय नसल्यामुळे दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. त्यामुळे विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच दूषित पाण्यामुळे लहन मुले व वयोवृद्धांना याचा अधिक धोका निर्माण होत आहे. त्यामुळे स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करवी अशी मागणी मांजसुंबा, नेकनूर, सात्रा,पोथरा, येथील नागरिकांमधून करण्यात येत आहे. 

जिल्ह्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी तपासणी केली जात आहे. पहिल्या टप्प्यातील तपासणीत जवळपास ५० टँकरला जीपीएस नसल्याचे समोर आले, तर पाणीपातळीतील घट तसेच उद्भव आटल्याने प्रशासनासमोर नवीन जलस्त्रोत आणि उद्भव शोधण्याचे आव्हान आहे. यातच दूषित पाण्याचे प्रमाण मोठे असल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.

प्रकल्पातील पाणीसाठा ०.४५ टक्केपाली येथील बिंदूसरा, उखंडा, उपळी, सिंदफना, भायाळा, तांदळवाडी यासह ज्या इतर धरणांमधून पाणी उपसा  केला जातो तेथील पाणीसाठा कमी होत आहे. आणखी एक महिना टॅक द्वरे पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. नागरिकांनीदेखील याचे भान ठेऊन पाण्याचे योग्य नियोजन करुन वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील सर्व मध्यम व लघु ८३ प्रकल्पातील पाणीसाठा ०.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. लहान-मोठे १४४ प्रकल्प आहेत. त्यापैकी ९४ प्रकल्पांमध्ये पाण्याचा एक थेंबदेखील शिल्लक नाही. इतर प्रकल्पातील साठा जोत्याच्या खाली आहे. त्यामुळे वेळेत पाऊस पडला नाही तर पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

पाण्याच्या टाक्या धूळखातदुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागात पाणी साठविण्यासाठी शासनातर्फे बीड जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात पाण्याच्या टाक्या दिल्या आहेत. सदरील टाक्या येऊन जवळपास दीड महिना उलटला असून, सध्या तहसील कार्यालयात त्या धूळ खात आहेत.औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यांनाही पाणी द्या. आचारसंहिता कालावधीत या टाक्या आल्याने त्याचे वाटप झाले नाही. आचारसंहिता शिथील होऊनही याकडे दुर्लक्षच होत आहे. बीड पंचायत समितीकडून प्रस्ताव न आल्याचे कारण सांगत तहसील कार्यालयाने टाक्यांचे वाटप थांबवलेले आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळBeedबीडWaterपाणी