बीड जिल्हा भाजपात असंतोष वाढताच; जवळपास ७० जणांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:55+5:302021-07-12T04:21:55+5:30
मुंडे भगिनींचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न खा. डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. पंकजा मुंडे, खा. ...

बीड जिल्हा भाजपात असंतोष वाढताच; जवळपास ७० जणांचे राजीनामे
मुंडे भगिनींचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न
खा. डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचे खच्चीकरण होत असल्याची भावना झाल्याने सभापती परिमळा घुले यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे पदाचा राजीनामा सुपूर्द करताना व्यक्त केली. शनिवारी तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनीही राजीनामा दिल्याने पक्षाबद्दल उघड नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबईत समर्थकांची गर्दी
यासंदर्भात बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे म्हटले. मी सोमवारी मुंबईत मुंडे भगिनींना भेटण्यासाठी जात आहे, असे मस्के यांनी सांगितले. मंगळवारी मुंबईत समर्थकांना मुंडे भगिनी संबोधित करतील, अशी माहिती आहे.
आष्टी तालुक्यातही उमटली नाराजी
भाजपच्या माजी जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार यांनी जि. प. सदस्यासह सर्व पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष म्हस्के यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. सरपंच राहुल काकडे, सरपंच एम. डी. लटपटे, पं. स. सदस्य लक्ष्मीबाई रावसाहेब लोखंडे, सरपंच राम गर्जे, ग्रा. पं. सदस्य आण्णा बांगर, कऱ्हेवाडीचे उपसरपंच बाळासाहेब सांगळे, सदस्य आर. डी. सांगळे यांनीही आपल्या पदाचे राजीनामे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत.