येथील पहिल्या प्रकरणात बबन शहाजी सानप यांच्या फिर्यादीवरून ‘ तुम्ही आमच्या शेतातून का जाता’ अशी भांडणाची कुरापत काढून, दगडाने डोक्यात मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात सानप यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब तांदळे, पद्मिनी तांदळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुधाकर भागवत तांदळे यांच्या फिर्यादीवरून ‘तुमच्या शेळ्या आमच्या शेतात का आल्या व पीक का खालले’ अशी भांडणाची कुरापत कढून काठीने मारहाण केली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बबन शहाजी सानप, हौसाबाई सानप, ज्योती संतोष सानप, संतोष बबन सानप यांच्यावर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ ढाकणे व पोना राठोड हे करत आहेत.
तांदळ्याच्या वाडीत दोन गटात वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:34 IST