ज्येष्ठांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:49+5:302021-06-26T04:23:49+5:30

केबलचोरीमुळे शेतकरी त्रस्त अंबेजोगाई : तालुक्यात सध्या शेतातील उसाला पाणी देणे सुरू आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यांतून शेतीला पाणी ...

Disadvantages of seniors | ज्येष्ठांची गैरसोय

ज्येष्ठांची गैरसोय

केबलचोरीमुळे शेतकरी त्रस्त

अंबेजोगाई : तालुक्यात सध्या शेतातील उसाला पाणी देणे सुरू आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यांतून शेतीला पाणी सोडण्यात आले होते. विद्युतपंप चालविण्यासाठी केबल अंथरण्यात आले होते. या केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत.

घरगुती गॅसचा गैरवापर

बीड : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा अंबेजोगाई तालुक्यात काही लोकांनी गोरखधंदा सुरू केला आहे. अंबेजोगाई शहरातून स्वत:च्या नावावर गॅस घेऊन त्या सिलिंडरची विक्री चढ्या भावाने व्यावसायिकांना केली जाते.

अवैध धंदे जोमात; यंत्रणेचे दुर्लक्ष

पाटोदा : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पानटपरी, तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो, तसेच अवैधरीत्या दारूची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.

गतिरोधक उभारावेत

बीड : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाची दुरवस्था झाली आहे. अनेक वेळा या सपाट झालेल्या गतिरोधकामुळे वाहनांच्या गतीला आवरता येत नसून, वाहनधारक सुसाट वेगाने वाहन चालवून धोका निर्माण करीत आहेत.

Web Title: Disadvantages of seniors