‘फॅन्स’ राष्ट्रीय संस्थेच्या संचालकपदी एच. पी. देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST2021-01-09T04:27:55+5:302021-01-09T04:27:55+5:30
मागील ३५ वर्षापासून एच. पी. देशमुख यांनी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, पिण्याचे पाणी व स्वच्छता व आरोग्य या ...

‘फॅन्स’ राष्ट्रीय संस्थेच्या संचालकपदी एच. पी. देशमुख
मागील ३५ वर्षापासून एच. पी. देशमुख यांनी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, पिण्याचे पाणी व स्वच्छता व आरोग्य या विषयावर काम केलेले आहे. नाबार्ड, कपार्ट, आयडब्ल्यूएमपी, स्विस एआयडी, वॉटर एआयडी, आयडब्ल्यूपी, फिनिश, अफर्म, आफ्रो, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांबरोबर सक्रिय काम केलेले आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद या चार जिल्ह्यातील ४८ गावात जलस्वराज्य, आपलं पाणी व आयडब्ल्यूएमपी या शासनाच्या प्रभावी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत, पाणीपुरवठा व आरोग्य समिती व पाणलोट समित्यांची क्षमता बांधणी, शौचालय बांधकामासाठी ग्रामस्थांचे मन परिवर्तन, महिला बचत गटामार्फत शौचालय बांधणीसाठी मोहीम उभी करणे या स्तरावर यशस्वी कामे केलेली आहेत. देशमुख यांना ॲडोकशीमधील एक्सपर्ट म्हणून ओळखले जाते म्हणून त्यांची देशातील बारा राज्यातून ‘फॅन्स’ राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या संचालकपदी निवड झाली आहे.