१९ जून रोजी होणार डिजिटल महेश नवमी उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:47+5:302021-06-17T04:23:47+5:30
बीड : माहेश्वरी समाजाचा वंशोत्पत्ती दिन महेश नवमी उत्सव यंदा १९ जून रोजी डिजिटल महेश नवमी म्हणून ...

१९ जून रोजी होणार डिजिटल महेश नवमी उत्सव
बीड : माहेश्वरी समाजाचा वंशोत्पत्ती दिन महेश नवमी उत्सव यंदा १९ जून रोजी डिजिटल महेश नवमी म्हणून साजरा होणार आहे, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुभाष शिवरतन मुंदडा हे व्हर्च्युअल पद्धतीने ‘कोव्हिड काल की सिखें अर्थ समाज’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
कोरोना महामारीमुळे हा उत्सव ऑनलाइन साजरा होत आहे. सोशल मीडियाद्वारे संपूर्ण समाज आपापल्या घरामध्ये हा कार्यक्रम साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण माँ वैष्णो पॅलेस येथून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. महेश नवमीनिमित्त उत्सव प्रतियोगिता, वृक्षारोपण, मोटिव्हेशनल स्पीच, टॅलेंट सर्च, सुनो कहानी, शिवपरिवार व्हिडिओ, शासकीय कागदपत्र शिबिर, उद्योजक मार्गदर्शन शिबिर, आदी उपक्रमांचे आयोजन केले आहे. कोरोनाकाळात महत्त्वाची भूमिका निभावणारे समाजातील डॉक्टरबांधवांचा यावेळी विशेष सन्मान होणार आहे. सर्व समाजबांधवांनी या कार्यक्रमास आपापल्या घरूनच सहपरिवार उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रदीप चितलांगे, सचिव संतोष सोहनी, तहसील अध्यक्ष गिरीश सोहनी, सचिव हेमंत बियाणी यांनी केले आहे.