शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

पक्ष वेगळे पण कुटुंब एकच; भाऊ धनंजय मुंडे तिसऱ्यांदा, तर बहीण पंकजा दुसऱ्यांदा मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:38 IST

परळी मतदारसंघातही पहिल्यांदाच एकाच वेळी दोन मंत्रिपदे

बीड : नव्या सरकारमधील नव्या मंत्रिमंडळातील ३९ मंत्र्यांनी रविवारी शपथ घेतली. यामध्ये वेगवेगळ्या पक्षात असलेले परंतु, एकाच कुटुंबातील धनंजय मुंडेपंकजा मुंडे या बहीण - भावाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. परळी मतदारसंघातही पहिल्यांदाच एकाच वेळी दोन मंत्रिपदे मिळाली आहेत.

राज्यातील राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील समीकरणेही बदलली होती. भाजपच्या पंकजा मुंडे यांना लाेकसभेत उमेदवारी दिली. परंतु, त्यांना यात अपयश आले. त्यानंतरही त्यांना विधानपरिषदेत संधी देण्यात आली. आता विधानसभा निवडणुकीत परळीतून विक्रमी मतांनी धनंजय मुंडे यांनी गुलाल उधळला. पंकजा या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आहेत, तर धनंजय मुंडे हेदेखील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या टॉपच्या नेत्यांमध्ये आहेत. त्यामुळे या दोघांच्या नावांची मंत्रिपदासाठी जास्त चर्चा होती. परंतु, अजित पवार गटाचे माजलगावचे आ. प्रकाश सोळंके आणि आष्टीतील भाजपचे आ. सुरेश धस यांनीदेखील मंत्रिपदासाठी जाेर लावला होता. परंतु, अखेर मुंडे बहीण - भावाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, या दोघांनीही रविवारी नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेतली.

धनंजय तिसऱ्यांदा, तर पंकजा दुसऱ्यांदा मंत्रीधनंजय मुंडे हे तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. २०१९मध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीत असताना त्यांनी सामाजिक न्याय विभाग, तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महायुतीत कृषिमंत्री पद सांभाळले होते. आता तिसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतली आहे. पंकजा मुंडे यांनी २०१४ ते २०१९ या काळात ग्रामविकास खाते सांभाळलेले आहे. त्या आता दुसऱ्यांदा मंत्री झाल्या आहेत.

बहीण-भाऊ एकत्र आल्याने बळसन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात परळी मतदारसंघात थेट लढत झाली होती. यात धनंजय मुंडे यांनी गुलाल उधळत मंत्रिपद मिळवले होते. परंतु, नंतर राजकीय घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाली. त्यामुळे पंकजा आणि धनंजय हे बहीण - भाऊ एकत्र आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोघांनीही एकमेकांचा प्रचार केला होता. आता दोघांनाही मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे जिल्ह्याला बळ मिळाले असून, विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

बीड जिल्ह्यातील आतापर्यंतचे मंत्रीजिल्ह्यात आतापर्यंत १४ जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. यामध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे, दिवंगत विमल मुंदडा, दिवंगत सुंदरराव सोळंके, जयदत्त क्षीरसागर, सुरेश नवले, सुरेश धस, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, बाजीराव जगताप, प्रकाश सोळंके, शिवाजीराव पंडित, बदामराव पंडित, अशोक पाटील, पंडितराव दौंड यांचा समावेश आहे. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे