धारूर तालुक्यात नदी-नाले, साठवण तलाव तुडुंब भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:12 IST2021-09-02T05:12:03+5:302021-09-02T05:12:03+5:30

धारूर : सोमवारी रात्री तीन ते चार तास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील नदीनाल्यांतून पाणी वाहिले ...

In Dharur taluka, rivers, streams and storage lakes are full | धारूर तालुक्यात नदी-नाले, साठवण तलाव तुडुंब भरले

धारूर तालुक्यात नदी-नाले, साठवण तलाव तुडुंब भरले

धारूर : सोमवारी रात्री तीन ते चार तास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील नदीनाल्यांतून पाणी वाहिले असून, साठवण तलाव तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाले आहेत. सोमवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरातील लहान नदी व नाल्यांना आला. या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश साठवण तलाव तुडुंब भरले आहेत. भोगलवाडी, अरणवाडी, चारदरी, घागरवाडा, मोरफळी, धारूर तलाव तुडुंब भरले आहेत. धारूर - वडवणी तालुक्यासाठी लाभदायी असलेला कुंडलिका साठवण तलाव आणि अरणवाडी साठवण तलाव तुडुंब भरल्याने सांडव्यावरून जोरदारपणे पाणी ओसंडून वाहू लागले आहे तसेच मागील काही दिवसांपूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने पावसाची पुन्हा पुनरागमन झाले आहे. यामुळे कापूस, सोयाबीन, बाजरी यासह खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे.

310821\img-20210831-wa0042.jpg

अरणविडी साठवण तलाव ओसंडून वाहताना

Web Title: In Dharur taluka, rivers, streams and storage lakes are full