धारूर घाटात कठडे तात्काळ उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:29 IST2021-02-05T08:29:27+5:302021-02-05T08:29:27+5:30
विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे आहेत. संरक्षण कठडयांचा अभाव ...

धारूर घाटात कठडे तात्काळ उभारावे
विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे आहेत. संरक्षण कठडयांचा अभाव असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातील विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड होतो. उघडे फ्यूज, तार व हे बॉक्स उघडेच असतात. या प्रकाराकडे महावितरणचे मोठे दुर्लक्ष होत आहे. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी रोहित्रांना संरक्षण कठडे अथवा भिंत बांधावी व कवाडे बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
पाणी उपलब्धतेने रबी पिके जोमात
अंबाजोगाई : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिसरातील विहिरी, इंधन विहिरी, पाझर तलाव व विविध जलस्त्रोत तुडुंब भरले. परिणामी रब्बी हंगाम मोठ्या प्रमाणात बहरला आहे. हरभरा, गहू, ज्वारी, करडई ही पिकेही चांगली आली असून, परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पिके जोमात असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान दिसू लागले आहे. यावर्षी तरी समाधानकारक उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
भुरट्या चोरांचा
वावर वाढला
अंबाजोगाई : गाडीतील पेट्रोल, बॅटरी, पाण्याची मोटार, पाईप, वायर अशा कंपाऊंडमधील वस्तूंच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील हद्दवाढ भाग तसेच रहिवासी भागातील घरांच्या कंपाऊंडमधील साहित्याच्या सर्रास चोऱ्या होत आहेत. या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.