धारूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री फोडली चार दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:27 IST2021-05-03T04:27:44+5:302021-05-03T04:27:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : शहरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार दुकाने फोडली; तर एक दुचाकी चोरल्याची घटना ...

In Dharur, four shops were burglarized in one night | धारूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री फोडली चार दुकाने

धारूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री फोडली चार दुकाने

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : शहरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार दुकाने फोडली; तर एक दुचाकी चोरल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून प्रवेश केला; तर किराणा दुकानाच्या गल्ल्यातील किरकोळ रोख व चिल्लर अशी सहा हजार रुपयांची रोकड लांबविली. या घटनेने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.

धारूर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून चोरट्यांना धाक बसेल अशी कोणतीच कार्यवाही होत नाही. शुक्रवारी (दि. ३०) मध्यरात्री शहरातील तेलगाव रोडवर असलेले सोन्याचे प्रवीण ज्वेलर्स, आयुषी मेडिकल, राज मेडिकल व गायकवाड गल्लीतील भगवान किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. यावेळी त्यांनी किराणा दुकानातील नोटा व चिल्लर मिळून सहा हजार रुपयांची रोकड लांबविली. इतर ठिकाणी मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. गायकवाड गल्ली येथील शिवाजी फावडे या व्यक्तीची दुचाकी चोरट्यांनी पळविली आहे. चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून, त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.

Web Title: In Dharur, four shops were burglarized in one night