शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

धारूर घाटात धोकादायक वळणाच्या ठिकाणी मालवाहू ट्रकचा पुन्हा तिहेरी अपघात दोन तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 19:54 IST

या अपघातामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती.

धारूर  (बीड ) : येथील घाटामध्ये अरूंद व धोकादायक वळणाच्या ठिकाणी मालवाहू ट्रकचा अपघात होण्याची मालिकाच सुरू आहे . बुधवारी साखरेच्या ट्रकचा अपघात झाल्यानंतर पुन्हा मालवाहू ट्रकचा तिहेरी अपघात झाल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती.

घाटात वळणाच्या ठिकाणी  ब्रेक फेल होणे व अरूंद ठिकाण असल्यामुळे मागील चार महिन्यापासून अपघातांची मालिका सुरू आहे. या अपघातामध्ये मालवाहू गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. सोमवारी  रात्री येडेश्वरी कारखान्यावरून साखरे ने भरलेला ट्रक तेलगाव कडे जात असताना  धोकादायक वळणाच्या ठिकाणी ब्रेक फेल होऊन पलटी झाला होता पुन्हा बुधवारी दुपारी अरुंद व धोकादायक वळणामुळे धारूर येथील घाटात साखरेचाच ट्रक खडुयात जाऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतांनाच गुरुवारी सकाळी म्हसोबा मंदीराजवळ वळणाच्या ठिकाणी गुरुवारी सकाळी तिन मालवाहू ट्रकच एकाच वेळी अपघात झाला.

यात कर्नाटकहून माजलगावकडे एक ट्रक बाजरी ( के.ए.२८, ए-६५०० ) जात होता. या वेळी तेल गावकडून तामीळनाडू कडे नॉयलॉन दोर घेवून जाणाऱ्या टी .एन.७४ , आर- ३७४६ ची समोरासमोर धडक झाली . या वेळी सांगलीहून परभणीकडे कुकूट खाद्य घेवून जाणाऱ्या एम .एच.२०, ए .टी -८८३२  ट्रकला बाजरी घेवून जाणाऱ्या ट्रकची बाजूने धडक झाली . यात दोन ट्रकचे समोरील भागाचे नुकसान झाले.या आपघाता मुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली होती.मोठी वाहणे हा रस्ता बंद झाल्याने जहागीरमोहा मार्गे न्यावी लागली.ग्रामीण भागातील जे विद्यिर्थी धारूर येथे शाळा महिविद्यालयास येतात त्याःना दोन ते तिन कि.मी.पायपीट करत यावे लागले .हा रस्ता अंरूद असल्याने अपघाताचा सापळाच हा रस्ता झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडhighwayमहामार्ग