धानोरा रोडचा तीन दिवस तर पूर्ण बीड शहरात एक दिवस पाणी बंद - फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST2021-01-08T05:47:58+5:302021-01-08T05:47:58+5:30
बीड : शहरात सध्या नव्याने होत असलेल्या अमृत योजनेच्या मुख्य जलवाहिनीला जुनी जलवाहिनी जोडण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. ...

धानोरा रोडचा तीन दिवस तर पूर्ण बीड शहरात एक दिवस पाणी बंद - फोटो
बीड : शहरात सध्या नव्याने होत असलेल्या अमृत योजनेच्या मुख्य जलवाहिनीला जुनी जलवाहिनी जोडण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे पूर्ण बीड शहराचा एक दिवस तर धानोरा रोडवरील जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. बीड नगरपालिकेने याबाबत मंगळवारी माहिती दिली.
बीड शहराला माजलगाव व पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. मागील अनेक वर्षांपूर्वीची शहरात जलवाहिनी आहे. त्यामुळे शहरात नव्याने अमृत योजना कार्यान्वित करण्यात आली. नव्या योजनेच्या जलवाहिनीला आता जुन्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे संपूर्ण बीड शहराचा एक दिवस पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच धानोरा रोड परिसरातील १९ लाख लीटर पाणी क्षमता असलेल्या जलकुंभातील पाणी अमृतच्या जलवाहिनीला जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पंचशील नगर, स्वराज्य नगर, संत नामदेव नगर, बालाघाट कॉलनी, कॅनॉल रोडवरील दोन्ही बाजू, शिवाजीनगर, नवागण कॉलेज रोडच्या दोन्ही बाजू, मित्र नगर, चाणक्य पुरी, गोविंदनगर, राजीव नगर, हौसिंग कॉलनी, नरसोबा नगर, अंकुश नगर, कालिका नगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, गोरे कॉलनी, चऱ्हाटा फाटा, पोलीस मुख्यालय आदी ठिकाणचा पाणी पुरवठा बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस बंद ठेवला जाणार आहे. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, पाणी पुरवठा अभियंता राहुल टाळके यांनी ही माहिती दिली. पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोट
जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. त्यामुळे धानोरा रोडवरील जलकुंभावरील तीन दिवस तर संपूर्ण बीड शहराचा एका दिवसासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या हे काम गतीने सुरू आहे. नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे.
डॉ. उत्कर्ष गुट्टे
मुख्याधिकारी, नगर परिषद बीड