शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

धनंजय मुंडेंचे कर्मभूमीत जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:05 AM

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या कर्मभूमी असलेल्या परळी शहरात शुक्रवारी रात्री ८ च्या दरम्यान आल्यानंतर धनंजय मुंडे यांचे उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देफटाक्यांची आतिषबाजी, विद्युत रोषणाई, उभारल्या कमानी : चार राज्यातून आली होती परळीत बँडपथके

परळी : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या कर्मभूमी असलेल्या परळी शहरात शुक्रवारी रात्री ८ च्या दरम्यान आल्यानंतर धनंजय मुंडे यांचे उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी व विद्युत रोषणाई करून मुंडे यांची मिरवणूक काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळयास पुष्पहार घालून वंदन केले. त्यानंतर त्यांचे सुशिल कराड यांनी क्र ेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून असे स्वागत केले. त्यानंतर त्यांची शहराच्या प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढली. या मिरवणुकीत महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक व मध्यप्रदेश येथून आलेले बॅन्ड पथक होते. देशभक्तीपर गीत गाऊन धनंजय मुंडे यांचे त्यांच्या चाहत्यांनी स्वागत केले.शुक्रवारी सकाळपासूनच मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली.येथील मोंढा मार्केट भागात त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणूक निघाली. या मिरवणूकीत आ.प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, आ.संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, संजय दौंड, अजय मुंडे, यांच्यासह इतर मान्यवर होते. शिवाजी चौकात युवक, महिला व चाहत्यांची विक्रमी गर्दी झाली होती. ‘धनंजय मुंडे आगे बढो’ च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या. सायंकाळी कारने बीडमार्गे परळीकडे मुंडे यांचे आगमन झाले. परळी तालुक्यातील पांगरी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी जावून धनंजय मुंडे यांनी दर्शन घेवून आशिर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी वडील स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जावून दर्शन घेतले.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडे