शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

‘त्या’ व्हिडीओ क्लिप प्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:39 IST

पंकजा मुंडे यांच्याबाबतीत सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडीओ क्लिपवरुन परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

परळी : पंकजा मुंडे यांच्याबाबतीत सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडीओ क्लिपवरुन परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या संदर्भात परळी शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जुगलकिशोर रामपाल लोहिया यांनी पोलीस ठाण्यात स्वत: फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या मोबाईलवर सोशल मीडियावरुन पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एक व्हिडीओ क्लिप पाहण्यात आली. त्यामध्ये त्यांच्याबद्दल धनंजय मुंडे यांनी अश्लील भावनेने हावभाव केले होते. १७ आॅक्टोबर रोजी धनंजय मुंडे यांनी विडा येथे केलेल्या प्रचारसभेतील भाषणाची ही क्लिप होती. एका महिलेबाबत अनुद्गार काढून अश्लीलरीत्या हातवारे करुन धनंजय मुंडे यांनी टीकाटिपणी केल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याविरुध्द मी फिर्याद दाखल केली आहे, असे जुगलकिशोर लोहिया यांनी फिर्यादीत म्हटले आहे.‘ती’ क्लिप बनावट आणि माझी बदनामी करणारी - धनंजय मुंडेपरळी : शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावरुन व्हायरल झालेली ती क्लिप एडीट करुन माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून, त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा. आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका, अशी विनंतीही केली. मी विरोधासाठी राजकारण करीत नाही, तर विकासासाठी करतो, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारीPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे