शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा उमेदवाराचा पराभव, महाविकास आघाडीचा पहिला सरपंच मुंडेंच्या परळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 15:55 IST

स्थानिक स्वराज संस्थांमधील ग्रामपंयात निवडणुकींतून महाविकास आघाडीचा पहिला सरपंच निवडून आला आहे

बीड - राज्यातील सत्तास्थापनेच्या चढाओढीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला यश आले. त्यामुळेच, शिवसेनेला पाठिंबा देत राज्यात महाविकास आघाडी निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. राज्यात सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपा विरोधी पक्षात बसला. त्यामुळे राज्यस्तरावर महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. मात्र, स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

स्थानिक स्वराज संस्थांमधील ग्रामपंयात निवडणुकींतून महाविकास आघाडीचा पहिला सरपंच निवडून आला आहे. आमदार धनंजय मुंडेंच्या मतदारसंघातील शिरसाळा ग्रामपंचायतीवर हा विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीच्या उमेदवार आश्रूबाई विश्वनाथ किरवले यांना पहिल्या सरपंचपदाचा मान मिळाला आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत ट्विट करुन आश्रुबाईंचे अभिनंदन केले आहे. तसेच, परळी मतदारसंघातून महाविकास आघाडीचा पहिला सरपंच निवडून आल्याचा मला अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटलंय. परळी तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या सिरसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी काल रविवारी पोटनिवडणूक झाली. या निवडणूकीत धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमती आश्रुबाई किरवले या उमेदवार म्हणून उभ्या होत्या. राज्यात नव्याने महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर त्याचा पहिलाच प्रयोग धनंजय मुंडेंनी सिरसाळा या आपल्या मतदारसंघात करताना तिन्ही पक्षांना एकत्रित करून एकच उमेदवार उभा केला. या उमेदवाराने भाजपा उमेदवार आशाबाई कपिल चोपडे यांचा 1395 मतांनी पराभव केला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेparli-acपरळीsarpanchसरपंचNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड