शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बियाणांची चढ्या भावात विक्री, उपाययोजना करण्यासाठी धनंजय मुंडेंचे कृषीमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 17:13 IST

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांची कृषी मंत्र्यांना पत्रातून मागणी

परळी: खरीप हंगामाच्या तोंडावर मराठवाड्यात काही क्षेत्रात पाऊस झाला तर काही क्षेत्रांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. परंतु, शेतकरी वर्गात सोयाबीन कपाशी यासह विविध बियाणे खरेदी करण्याबाबत लगबग सुरू आहे. याचाच फायदा घेऊन अनेक प्रकारचे बोगस बियाणे राज्यभरात बाजारात आणून प्रसिद्ध ब्रँडची नावे वापरून, चढ्या भावाने विक्री केली जात आहेत. शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक टाळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे कृषिमंत्र्यांकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

एक जून रोजीच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली एमआयडीसी परिसरात छत्रपती संभाजीनगर येथील एका नामांकित कंपनीच्या नावाचे बोगस बियाणे कृषी विभागाने जप्त केले होते; त्यांची किंमत दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. याच प्रकारचे बोगस बियाण्यांचे रॅकेट राज्यभरात सर्वत्र सक्रिय झालेले आहेत, याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होऊ शकते, मात्र या रॅकेटचा संपूर्ण बंदोबस्त करून यावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला अद्याप यश आले नाही; असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

कपाशीच्या बाबतीत कबड्डी नावाचा वाण लोकप्रिय आहे, कबड्डीच्या एका बॅगची किंमत 850 रुपयांच्या आसपास आहे, मात्र हे बियाणे दोन हजार रुपयांपेक्षा अधिक भावाने विक्री केले जात असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांनी भावावरून दुकानदारास विचारणा केल्यास दुकानदार सरळ सदर बियाणे संपले आहे, असे सांगून मोकळे होतात अशा पद्धतीने चढ्या भावाने विक्री व साठेबाजी केली जात असल्याचीही धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे. सोयाबीनच्या महाबीज 71 या वाणाच्या बाबतीतही तशीच परिस्थिती आहे.

आधीच शेकडो संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांची ऐन खरिपाच्या तोंडावर फसवणूक होऊ नये, यासाठी शासनाने कृषी निविष्ठा दुकानांवर करडी नजर ठेवण्यासाठी अधिकची विशेष पथके नेमावीत, तसेच आवश्यक सर्व उपाययोजना, धाडी व धडक कारवाया करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAbdul Sattarअब्दुल सत्तार