शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लोक कोठडीपर्यंत येत असतील तर भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार? धनंजय देशमुखांचे पोलिसांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:57 IST

धनंजय देशमुख यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांनाही पत्र लिहित बालाजी तांदळेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Santosh Deshmukh Murder Case :  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून काही फरार आहेत. तर या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालेला वाल्मीक कराड दोन दिवसांपूर्वी सीआयडीला शरण आला आहे. कोर्टाने वाल्मीक कराडला कोठडी सुनावली आहे. मात्र कोठडीत कराडला विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशातच मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणी पोलीस अधिक्षकांना पत्र लिहीलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना पवनचक्की प्रकरणात दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड सीआयडीला शरण आला होता. कोर्टाने कराडला १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. मात्र यादरम्यान, वाल्मीक कराडला खास वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच एका माजी सरपंचाने कराड याची पोलीस कोठडीत भेटल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.  माझ्या भावाला न्याय कसा मिळणार असा सवाल करत धनंजय देशमुख यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांना पत्र लिहीलं आहे. वाल्मिक कराडसारख्या व्यक्तीला अगदी कोठडीपर्यंत लोक भेटायला येत असल्याचेही देशमुख यांनी या पत्रात म्हटलं आहे.

काय म्हटलंय पत्रात?

शहर पोलीस ठाणे बीड येथे वाल्मिक कराड यांना मिळणाऱ्या सुविधा व यंत्रणेचा गैरवापर याबद्दल हे पत्र लिहीले असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

"आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्याने हुज्जत घातली व आपण सीआयडीसोबत आलो आहोत असे सांगितले. येथील दंगल पथकातील कर्मचारी यांना आपण सीआयडीचा वाहनचालक असल्याचे म्हटला. रेडेकर यांच्याशी हुज्जत घालणारे बालादी तांदळे यांच्यावर कार्यवाही करण्याचा विषय काढता त्या ठिकाणी असेलले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करुन बोला असे उलट रेडेकर यांनाच बोलले व तांदळे यांना बाजूच्या रुममध्ये बसवून नंतर सोडून दिले. साहेब माझी आपल्याकडे तक्रार आहे की ज्या ठिकाणी आरोपी आहेत अशा ठिकाणी असे लोक येतात कसे? खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या घुले नामक आरोपीचा फोटो दाखवणे म्हणजे मला दहशती खाली घेत होता अशी माझी तक्रार आहे. अशा लोकांनी थेट कोठडीपर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार? तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा अशी शंका या ठिकाणी मला आलेली आहे. या संदर्भाने आपण बालाजी तांदळे यांची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मी करत आहे. यावेळी एपीआय दराडे यांनी तांदळे यांना पाठीशी का घातले? दराडे आणि तांदळे यांचे संगनमत असून यातून तपास प्रभावित होत असेल तर? माझ्या भावाची हत्या झालेली आहे यात कुठे हलगर्जी केली तर आरोपींना शासन होणार नाही. यासाठी बालाजी तांदळे व एपीआय दराडे यांची चौकशी अपेक्षित असून यांना वाल्मीक कराड यांच्यापासून दूर ठेवावे अशी मी मागणी करत आहे. वरील घटना घडली तेव्हा माझ्या समवेत माझे साडू दादासाहेब बाबुराव खिंडकर तथा माझे सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी नितीन जाधव हे होते, असं धनंजय देशमुख यांनी पत्रात म्हटलं आहे.

धनंजय देशमुखांनी केलेला दावा खोटा - बालाजी तांदळे

"मला सीआयडीने चौकशीसाठी बोलावल्याने मी पोलीस ठाण्यात गेलो होतो. मी सरपंच असल्याने वाल्मीक कराड याच्याशी माझा संबंध आलेला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी मला तीन तास तिथं चौकशीसाठी थांबवलं होतं. मात्र यावेळी मी वाल्मीक कराडला भेटलेलो नाही. धनंजय देशमुखांनी केलेला दावा खोटा आहे," असं स्पष्टीकरण माजी सरपंच बालाजी तांदळे यांनी दिलं आहे.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडBeedबीडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी