शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे बंधू-भगिनीच्या परळीत ग्रामपंचायत निवडणुकांत चुरस, समर्थकांत मोर्चे बांधणी जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 19:17 IST

मुंडे बहीण- भावांच्या समर्थकात ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूकित आता टाईट फाईट होणार आहे.

- संजय खाकरेपरळी (बीड) : तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे व भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकानी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे .गेल्या आठ दिवसापासूनच गावागावात निवडणुकीचे वातावरण चांगले तापू लागले आहे, आ.धनंजय मुंडे यांनी आपल्या आघाडी च्या सत्तेच्या काळात ग्रामीण भागात विकास कामासाठी निधी दिला असल्याने त्यांचे समर्थक गावागावातील प्रभागात पोहोचले आहे तर ग्रामीण भागात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे भाजपला मानणारा मोठा वर्ग आजही कायम आहे. त्यातच पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असतानाही ग्रामीण भागातील रस्ते व इतर विकास कामासाठी दिलेले योगदानही भाजपच्या कार्यकर्त्यांना फायद्याचे ठरणार आहे

त्यामुळे मुंडे बहीण- भावांच्या समर्थकात ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूकित आता टाईट फाईट होणार आहे. ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठका माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या आहेत तर पंकजा मुंडे यांनी ग्रामीण भागाचा एक दौरा पूर्ण केला आहे तसेच सोमवारपासून त्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात निवडणुकीच्या अनुषंगाने आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धनंजय मुंडे यांच्याकडून पूर्वीपासूनच बळ मिळाले आहे त्यामुळे गावागावात त्यांचे कार्यकर्ते स्ट्रॉंग पणे निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत तर भाजपचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने कामाला लागले चित्र पहावयास मिळत आहे.

2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या मुंडे बंधू भगिनींसाठी महत्त्वाच्या ठरणार असल्याने त्यांनीही ग्रामपंचायतकडे पूर्णता लक्ष देण्याचे ठरविले आहे , ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काही गावातील कार्यकर्ते पक्षांतर करीत आहेत,त्यामूळे 80 ग्रांमपचायत मध्ये निवडणुकीचे वातावरण तापू लागलं आहे, भाजप व राष्ट्रवादीच्या समर्थकांनी आपली प्रतिष्ठा पणा ला लावून ग्रामपंचायत जिंकायचीच असा चंग केला आहे, अनेक ग्रामपंचायती मध्ये जवळचे नातेवाईक ,व भावकीच्या निवडणुका पहावयास मिळणार आहेत,तर बिनविरोध निवडुकी चे दुर्मिळ असेल असे जाणकार सांगतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे