ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त धम्मदेसना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:20+5:302021-06-24T04:23:20+5:30
बीड : येथील प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेच्यावतीने तालुक्यातील शिवनी येथील भदंत आनंद कौसल्यायननगर ...

ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त धम्मदेसना
बीड : येथील प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेच्यावतीने तालुक्यातील शिवनी येथील भदंत आनंद कौसल्यायननगर येथे २४ जून रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त पु. भिक्खु धम्मशील हे धम्मदेशना देणार आहेत. याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, समाज कल्याण सहायक आयुक्त सचिन मडावी, जि. प. चे कार्यकारी अभियंता सी. जी. सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत.
प्रारंभी धम्म ध्वजारोहण व बुद्ध वंदना होईल. त्यानंतर वृक्षारोपण होणार आहे. यावेळी धम्म उपासक-उपासिका व सर्व उपस्थितांना संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांच्यावतीने खीरदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी सर्व धम्म बंधू-भगिनी उपासक-उपासिका व धम्मप्रेमी यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.