मयूर अभयारण्यासह इतर पर्यटन क्षेत्रांचा होणार विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:11+5:302021-02-05T08:27:11+5:30
- फोटो बीड : जिल्ह्यातील पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. हाच धागा पकडून बीडचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुशिल पिंगळे ...

मयूर अभयारण्यासह इतर पर्यटन क्षेत्रांचा होणार विकास
- फोटो
बीड : जिल्ह्यातील पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. हाच धागा पकडून बीडचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुशिल पिंगळे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे हा मुद्दा मांडला. यावर लवकरच सर्व पर्यटन क्षेत्रांचा विकास करू, असे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याचे पिंगळे म्हणाले.
जिल्ह्यात मयुर अभयारण्य, सौताडा, कपीलधार, कंकालेश्वर अशी विविध ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाण आहेत. परंतु यांच्या विकासाकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसते. त्यामुळे त्यांची अवस्था बिकट होत चालली आहे. याच्या विकासासंदर्भात सुशिल पिंगळे यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील सर्वच पर्यटन क्षेत्रांची माहिती देण्यासह वास्तव स्थिती मांडली. यावर त्यांनी तत्काळ कारवाई करून विकासासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. पिंगळे यांनी पर्यटन विकासाचा मुद्दा हाती घेतल्याने जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.