शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बीडमध्ये विकासाचे मुद्दे माघारले; जातीपातीची लागली कसोटी; तिरंगी लढत : पंकजा मुंडेंना बजरंग सोनवणेंचे खरे आव्हान

By सोमनाथ खताळ | Published: May 07, 2024 8:56 AM

जातीच्या राजकारणाचा कोणाला् तोटा होऊन कोणाला फायदा होणार हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे.

- सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकसभा निवडणुकीतील प्रचारात सध्या तरी जातीचे राजकारण सुरू आहे. विकासाच्या मुद्यावर बोलण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप करण्यातच उमेदवार धन्यता मानत आहेत. यावेळी तिरंगी लढत होत आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासमोर खरे आव्हान हे मविआचे अर्थात शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचेच आहे. परंतु, जातीच्या राजकारणाचा कोणाला् तोटा होऊन कोणाला फायदा होणार हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे.

येथून भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे सलग दोन वेळा खासदार झाल्या. त्या हॅटट्रिक साधणार, असे वाटत असतानाच पक्षाने त्यांचे तिकीट कापून पंकजा यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात बजरंग सोनवणे आणि वंचितचे अशोक हिंगे हे निवडणूक रिंगणात आहेत. २०१९ रोजी पराभूत झालेले बजरंग सोनवणे यांना सलग दुसऱ्यांदा मविआने उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे ओबीसी, सोनवणे मराठा आणि हिंगे कुणबी मराठा म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळेच सध्या विकासापेक्षा जातीपातीचेच राजकारण अधिक सुरू आहे. 

मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच एकत्रगोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या काका-पुतण्यातील राजकीय वैर सर्व राज्याला माहिती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमधील भाजपचे नेतृत्व त्यांची मोठी मुलगी पंकजा मुंडे यांनी केले. २०१९ च्या विधानसभेत त्यांच्याविराेधात भाऊ धनंजय मुंडे होते. त्यांनी पंकजा यांचा पराभवही केला. परंतु राज्यातील राजकीय घडामोडींमुळे भाजप- अजित पवार गटात युती झाली. त्यामुळेच पंकजा आणि धनंजय हे दोघे बहीण-भाऊ एकत्र आले. पहिल्यांदाच लोकसभेत मुंडे बहीण-भाऊ एकत्र प्रचार करत आहेत. याचा पंकजा यांना लाभ होऊ शकतो. मागील २०१९ च्या लोकसभेत धनंजय यांनी बहीण डॉ. प्रीतम यांच्याविरोधात प्रचार केला होता. परंतु तरीही राष्ट्रवादीचे उमेदवार सोनवणे यांचा पराभव झाला होता.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी २०२४ ला अर्ज भरायला येताना रेल्वेतूनच येणार, असे ठणकाहून सांगितले होते. परंतु अद्यापही रेल्वे बीडपर्यंत आली नाही. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले जात आहे. ओबीसी, मराठा आरक्षणावरूनही आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मराठा आरक्षणासाठी महायुतीच्या उमेदवारासह नेत्यांची गावागावात होणारी अडवणूक

स्थानिकला गटतट, पण प्रचारात एकत्रजिल्ह्यात महायुतीकडे एका खासदारासह सहा आमदार आहेत. तर मविआकडे एक खासदार आणि एक आमदार आहे. संख्याबळाच्या तुलनेत महायुती मजबूत आहे. युतीचे सर्व नेते पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी धावपळ करत आहेत. असे असले तरी स्थानिक पातळीवरील गटतट प्रकर्षाने जाणवत आहेत. याचा फटका फारसा जाणवणार नाही.

२०१९ मध्ये काय घडले?डॉ. प्रीतम मुंडे    भाजप (विजयी)    ६,७८,१७५बजरंग सोनवणे    राष्ट्रवादी    ५,०९,८०७प्रा. विष्णू जाधव    वंचित बहुजन आघाडी    ९२,१३९नोटा    -    २५००

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार      पक्ष         मते         टक्के२०१४    प्रीतम मुंडे (पो.नि.)    भाजप     ९,२२,४१६    ७१%२०१४    गोपीनाथ मुंडे    भाजप    ६,३५,९९५    ५१%२००९    गोपीनाथ मुंडे    भाजप    ५,५३,९९४    ५१%२००४    जयसिंग गायकवाड    रा.काँ.     ४,२५,०५१    ३२%१९९९    जयसिंग गायकवाड    भाजप    ३,३२,९४६    ४१%

टॅग्स :beed-pcबीडPankaja Mundeपंकजा मुंडेbajrang sonwaneबजरंग सोनवणे