सव्वाआठ लाखांचा गुटखा पिंपळनेर येथे नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:19 IST2018-11-21T00:18:26+5:302018-11-21T00:19:27+5:30
दोन महिन्यांपूर्वी पकडलेला ८ लाख २३ हजार ४०० रूपयांचा गुटखा पिंपळनेर येथे नष्ट करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन व पिंपळनेर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी केली.

सव्वाआठ लाखांचा गुटखा पिंपळनेर येथे नष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दोन महिन्यांपूर्वी पकडलेला ८ लाख २३ हजार ४०० रूपयांचा गुटखा पिंपळनेर येथे नष्ट करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन व पिंपळनेर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी केली.
११ सप्टेंबर २०१८ रोजी पिंपळनेर पोलिसांनी गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी गुन्हाही नोंद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने निकाल दिल्याप्रमाणे सहायक आयुक्त एम.डी.शहा यांच्या आदेशावरून ८ लाख २३ हजार रूपयांचा गुटखा नष्ट करण्यात आला. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे, ऋषीकेश मरेवार, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत उबाळे, नमुना सहायक मुख्तार शेख आदींची उपस्थिती होती.