नायब तहसीलदाराने उभा राहून शेतरस्ता केला मोकळा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:29 IST2021-03-22T04:29:41+5:302021-03-22T04:29:41+5:30
धारूर : तालुक्यातील हिंगणी येथे दहा वर्षांपासून रखडलेला शेतरस्ता नायब तहसलदारांनी स्वत: उभा राहून मोकळा करत शेतकऱ्याची अडचणी दूर ...

नायब तहसीलदाराने उभा राहून शेतरस्ता केला मोकळा - A
धारूर : तालुक्यातील हिंगणी येथे दहा वर्षांपासून रखडलेला शेतरस्ता नायब तहसलदारांनी स्वत: उभा राहून मोकळा करत शेतकऱ्याची अडचणी दूर केली.
तालुक्यातील हिंगणी येथील सूर्यकांत भागवत सोळंके यांच्या गट नंबर १८२ व १८३ मधील शेतात शेती कामासाठी गाडी रस्ता नसल्याने, त्यांना आपल्या शेतातील मशागतीची कामे, शेतातील माल व साहित्य दूरवरून डोक्यावर घेऊन जावे लागत होते, तसेच शेतील कामे करण्यासही अडचणी होत्या. शेतकरी सूर्यकांत सोळंके यांनी तहसील कार्यालयात धाव घेत व्यथा मांडली. नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी स्वतः पंचनामा करून अर्जदार व गैरअर्जदारांना सुनावणीला बोलवून सर्व शेतकऱ्यांचे नुकसान न होता, सर्वे नंबरप्रमाणे रस्ता मोकळा करून देत, शेतरस्त्याचा प्रश्न निकाली काढला. या कार्यवाहीनंतर शेतकरी सूर्यकांत सोळंके यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी तलाठी अशोक मोहिते व संबंधित दोन्ही बाजूंचे शेतकरी उपस्थित होते.
===Photopath===
200321\1205img-20210320-wa0118_14.jpg