शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला; आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 08:49 IST

बीडमधील प्रकार, सेवेत कायम करून घेण्यासाठी करीत होते घोषणाबाजी. आरोग्य यंत्रणेचे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने तीन महिन्यांच्या कंत्राटावर वॉर्डबॉय, परिचारिका, डाटा एंट्री ऑपरेटर, हॉस्पिटल मॅनेजर, डॉक्टर, औषधनिर्माण अधिकारी, आदी पदे भरण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले; परंतु आता रुग्णसंख्या कमी झाल्याने या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  बीड : आरोग्यसेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करून घ्यावे, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अडविला. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करीत जमाव पांगविला. यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. 

आरोग्य यंत्रणेचे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने तीन महिन्यांच्या कंत्राटावर वॉर्डबॉय, परिचारिका, डाटा एंट्री ऑपरेटर, हॉस्पिटल मॅनेजर, डॉक्टर, औषधनिर्माण अधिकारी, आदी पदे भरण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले; परंतु आता रुग्णसंख्या कमी झाल्याने या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येत आहे. कामावरून काढू नये, आरोग्यसेवेत कायम करून घ्यावे, यासाठी आरेाग्य कर्मचारी आक्रमक झाले होते. 

 जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपवून उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा उस्मानाबादकडे रवाना झाला. याचदरम्यान शासकीय विश्रामगृहासमोर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी गाड्यांचा ताफा अडविला. यावेळी तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. काही कर्मचारी दुभाजकावरून पडल्याने जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत पवार यांची भेट मागणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात  घेतले आहे.

लाठीचार्जची चौकशी कराकोरोना महामारीत या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले. हे लोक आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेल्यावर त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो, ही बाब निषेधार्ह आहे. कोणाच्या सांगण्यावरून हा लाठीचार्ज केला, याला कोण जबाबदार याची चौकशी करावी.    सुरेश धस, आमदार, भाजप   

निवेदन न घेताच ताफा सुसाटn कर्मचारी निवेदन देण्यासाठी गाड्यांकडे धावले; परंतु एकाही मंत्र्याने अथवा अधिकाऱ्यांनी त्यांचे निवेदन घेतले नाही. त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले होते. n ताफा पुढे गेल्यावर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु तरीही कर्मचारी आक्रमक होते. सरकारविरोधात घोषणा देत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. 

संतापजनक बाबपोलिसांच्या लाठीचार्जचा आम्ही निषेध करतो. महिलांवर पोलिसांनी हात उगारला. याची चौकशी करावी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे खाली उतरले. पालकमंत्री या नात्याने त्यांनी निवेदन स्वीकारणे गरजेचे होते. परंतु ते गाडीत बसून निघून गेले. ही बाब संतापजनक आहे. सर्वांना सेवेत कायम करून घ्यावे, अशी आमची मागणी आहे, असे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस