शेतकरी कायद्यांविरोधात वंचित आघाडीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST2021-03-06T04:31:36+5:302021-03-06T04:31:36+5:30
गेवराई : शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात ...

शेतकरी कायद्यांविरोधात वंचित आघाडीचे आंदोलन
गेवराई : शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
दिल्लीच्या सीमेवर मागील साडेतीन महिन्यांपासून शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी केंद्र शासनाविरोधात आंदोलन सुरु आहे. देशभरातही विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ गेवराईतही आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने २००६मध्ये केलेला कायदा मागे घ्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने गेवराई तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सय्यद सुभान, सुदेश पोतदार, पप्पू गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष बंटी सौदरमल, ज्ञानेश्वर हवाले, कैलास भोले, किशोर भोले, पप्पू वावळ, सतीश प्रधान, कुमार भोले, रंजित शिंदे, प्रदीप तुरूकमारे, एकनाथ आडे, आदी उपस्थित होते.
===Photopath===
050321\sakharam shinde_img-20210305-wa0014_14.jpg