वंचित बहुजन आघाडीचे महागाई विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST2021-06-22T04:23:08+5:302021-06-22T04:23:08+5:30

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महगाईचा प्रश्न सरकारसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सर्व ...

Deprived Bahujan Front's agitation against inflation | वंचित बहुजन आघाडीचे महागाई विरोधात आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचे महागाई विरोधात आंदोलन

वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महगाईचा प्रश्न सरकारसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सर्व तालुका, जिल्हा पातळीवर महागाई विरोधी धरणे आंदोलन करण्याचा आदेश दिला. त्यानुसार गेवराईत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ‘महाग भाजी, महाग डाळ, देशातील जनता झाली बेहाल’ अशा शब्दात तीव्र निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सय्यद सुभान, जिल्हा उपाध्यक्ष सुदेश पोतदार, बंटी सौंदरमल, कैलास भोले, बाबूराव गायकवाड, पप्पू वाव्हळ, महेश माटे, शिवाजी भोले, डॉ. रामप्रसाद नागरे, उमेश निकाळजे, प्रमोद निकाळजे, प्रशांत राऊत, सुनील सदाफुले, विलास वावधने, महेश कांबळे, कुमार भोले, लखन मगर, बाळासाहेब पटेकर, सुधाकर केदार, आनंद वाव्हळ, आबुज वचिष्ठ, गायके कांताराम, संदेश पोदार, उबाळे, शाकेर, बोराडे, गायकवाडसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Deprived Bahujan Front's agitation against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.