शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीचे ९ लाख अडकले; मुलांना डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वडिलाने जीवन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:58 IST

पैशांअभावी मुलीने शिक्षण अर्धवट सोडले; मुलाचीही बारावी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ओढाताण

- सखाराम शिंदेगेवराई (जि. बीड) : मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुरेश आत्माराम जाधव (४६, रा. खळेगाव, ह.मु. गणेशनगर, गेवराई) यांनी मल्टिस्टेटमध्ये ठेवलेले पैसे न मिळाल्याने कंटाळून स्वत:लाच संपविले.

तालुक्यातील खळेगाव येथील सुरेश आत्माराम जाधव यांच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले. घरात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असे कुटुंब खळेगाव येथे राहायचे. यातच सुरेश जाधव यांना मणक्याच्या आजाराने ग्रासले, तरीही मुलगी व मुलाला चांगले शिक्षण देऊन त्यांना डॉक्टर करण्याचे स्वप्न उराशी बाळगत सुरेश जाधव शेतात काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होते. सुरेश यांना तीन एकर शेती. त्यापैकी दोन एकर शेती त्यांनी विकल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी जाधव हे पाच-सहा वर्षांपूर्वी गेवराई शहरात राहायला आले होते. मोठी मुलगी साक्षी ही बारावी उत्तीर्ण होऊन लातूर येथे नीटची तयारी करत होती.

येथील छत्रपती मल्टिस्टेटमध्ये जाधव यांचे ठेवीचे ९ लाख रुपये अडकले होते. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. फी भरता आली नाही, म्हणून मुलगी लातूर येथून अर्धे शिक्षण सोडून आली होती, तर मुलगा शुभम हा बारावी पास होऊन क्लास करत होता. दोघांनाही डॉक्टर करायचे होते. मात्र, मल्टिस्टेटमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवलेले नऊ लाख रुपये शिक्षणासाठी मिळावेत, यासाठी दोन वर्षांपासून चकरा मारल्या. परंतु, पैसे मिळाले नाहीत. या त्रासाला कंटाळून सुरेश जाधव यांनी मल्टिस्टेटसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली.

दोन वर्षांपासून ठेवीदारांचे पैसे देणे बंदछत्रपती मल्टिस्टेटच्या २५ शाखांवर दरमहा होणारा खर्च आणि ठेवीदारांना द्यावे लागणाऱ्या व्याजाचा भार यामुळे ही मल्टिस्टेट आर्थिक अडचणीत आल्याचे सूत्रांनी सांगितले. गेवराई शाखेत गेल्या दोन वर्षांपासून ठेवीदारांचे पैसे देणे बंद केल्याने ठेवीदार अडचणीत आले. यातूनच बुधवारी पहाटे एका ठेवीदाराने गळफास घेतल्याची घटना घडली.

जवळपास २०० कोटींच्या ठेवीछत्रपती मल्टिस्टेटच्या गेवराई, बीड, छत्रपती संभाजी नगर, पुणे, अहिल्यानगरसह राज्यांत जवळपास २५ शाखा आहेत. या शाखांमध्ये शेकडो ठेवीदारांच्या जवळपास २०० कोटींपेक्षा जास्त ठेवी असल्याचे सांगण्यात येते.

दोन गुन्हे दाखल, एका प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचे आदेशगतवर्षी या मल्टिस्टेटच्या प्रमुखावर पुणे व जालना जिल्ह्यात, असे दोन गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. तर, दोन दिवसांपूर्वीच गेवराई येथील ठेवीदार भागुजी धोंडिबा धुळगुंडे यांनी छत्रपती मल्टिस्टेटमध्ये अडकलेले ११ लाख ४७ हजार रुपये मिळावेत म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. यात छत्रपती मल्टिस्टेटचे चेअरमन संतोष ऊर्फ नाना बसंता भंडारीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्याEducationशिक्षण