आष्टीत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST2021-06-20T04:23:06+5:302021-06-20T04:23:06+5:30

आष्टी: कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शुक्रवारी बीडमध्ये झालेल्या लाठीमाराचा आष्टी येथील ...

Demonstrations of contract health workers in Ashti | आष्टीत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची निदर्शने

आष्टीत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची निदर्शने

आष्टी: कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शुक्रवारी बीडमध्ये झालेल्या लाठीमाराचा आष्टी येथील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी निषेध करीत ग्रामीण रुग्णालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने केली. त्यानंतर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

कोराना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी दोन वर्षापासून स्वतःचा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा देत आहेत. त्यांची भावना समजून घेणे गरजेचे असताना त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. हा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अपमान असल्याचे नमूद करून या घटनेचा सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध केला. यावेळी तहसीलदार व आ. सुरेश धस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. अमित डोके, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. रूपाली राऊत, डॉ. गणेश फुंदे,डाॅ. इमरान शेख, डॉ. राहुल फुंदे, डॉ. मोरे, संदिपान धस, रवी माने, अमोल रसायली, श्यामल गायकवाड, योगेश डोंगर, दीपक कुंदारे, किरण तुपे, सुरेश पोकळे आदी उपस्थित होते.

===Photopath===

190621\img-20210619-wa0343_14.jpg

Web Title: Demonstrations of contract health workers in Ashti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.