ऑनलाइन पोस्टर स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणिवांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:43+5:302021-03-07T04:30:43+5:30

कोरोनामुळे ही स्पर्धा ॲानलाइन घेण्यात आली. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विज्ञान विभागाने इयत्ता पहिली ते चौथी ...

Demonstration of students' scientific awareness through online poster competition | ऑनलाइन पोस्टर स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणिवांचे दर्शन

ऑनलाइन पोस्टर स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणिवांचे दर्शन

कोरोनामुळे ही स्पर्धा ॲानलाइन घेण्यात आली. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विज्ञान विभागाने इयत्ता पहिली ते चौथी या मुलांसाठी पर्यावरण संवर्धन तर इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थांसाठी कोरोनापासून रक्षण, वनस्पतींचे आकृतिशास्त्र आणि शरीरशास्त्र, प्रदूषकांना कसे नियंत्रित करावे इत्यादी विषय दिले होते. या विषयांवर विद्यार्थ्यांनी सविस्तर माहितीचे व्हिडिओ तयार करून ते अपलोड केले होते. कोरोनाच्या काळात विज्ञान व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही स्पर्धा आर. के. पब्लिक स्कूलद्वारे घेण्यात आली. कोरोनामुळे सर्व शाळा बंद असताना विज्ञान युगात आपण प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत ॲानलाइन पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणिवांचे दर्शन घडले. स्पर्धेचा निकाल उपप्राचार्य आर.चाकणकर यांनी ॲानलाइन घोषित केला. यात सोहम जावळे, स्मिता नागरे, अथर्व मुंदडा, आराध्या बाहेती, आरोही इंगोले, स्वराज यादव, वेदांत माळी, सिद्धी पवार, सार्थक गोरे, बालाजी खेडेकर, रितेश जयस्वाल, आर्य गडीकर, तन्वी देवपारे, मयुरी चोरमले, आर्य देशमुख, अभिमन्यू कुटे, काझी महेमूद, जयदीप जामकर, निकुंज पांडे, शर्वाणी शिंगरे, प्रतीक जाधव या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. पार्थ प्रतिष्ठानच्या अध्यक्ष योगिता चाळक व सचिव आर. के.चाळक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या स्पर्धेचे नियोजन प्राचार्य गणेश चाळक, उपप्राचार्य आर. चाकणकर, राजकन्या कुटे, सुप्रिया तनपुरे व सर्व शिक्षकांनी केले.

===Photopath===

060321\sakharam shinde_img-20210305-wa0032_14.jpg~060321\sakharam shinde_img-20210305-wa0031_14.jpg

Web Title: Demonstration of students' scientific awareness through online poster competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.