बांधावर जाऊन शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST2021-06-25T04:23:53+5:302021-06-25T04:23:53+5:30
गेवराई : कृषी विभागाकडून कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहेत. फळबागांसह खरीप हंगामातील ...

बांधावर जाऊन शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक
गेवराई : कृषी विभागाकडून कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहेत. फळबागांसह खरीप हंगामातील पिकांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, पेरणी अगोदर बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन यावेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाकडून २१ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. पेरणी अगोदर बीजप्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी हा या मोहिमेचा उद्देश आहे. गेवराई कृषी विभागामार्फत गावोगावी कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत २२ जून रोजी मौजे बाग-पिंपळगाव येथील शेतकरी कृष्णा कोटंबे यांच्या शेतावर बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, बदनापूर मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगितले. यावेळी त्यांनी मोसंबी पिकाबाबत मार्गदर्शन केले. तसेच खरीप हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांची विविध पिकांची पेरणी सुरू केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदर बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. या कार्यक्रमासाठी गेवराई तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब सोनवणे, कृषी पर्यवेक्षक आर. आर. चव्हाण, कृषी सहायक गणेश वाणी, महेश बोरुडे, समूह सहायक गणेश बर्गे सह बाग-पिंपळगाव, बेलगाव, पांढरवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
240621\24_2_bed_1_24062021_14.jpg
===Caption===
बीज प्रात्यक्षिक