ज्येष्ठ साहित्यिका मंदाताई देशमुख यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 05:06 IST2018-03-15T05:06:01+5:302018-03-15T05:06:01+5:30

ज्येष्ठ साहित्यिका तथा कवयित्री मंदाताई पुरुषोत्तम देशमुख (६९) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Demographer Mandatai Deshmukh passed away | ज्येष्ठ साहित्यिका मंदाताई देशमुख यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिका मंदाताई देशमुख यांचे निधन

अंबाजोगाई (जि. बीड) : येथील ज्येष्ठ साहित्यिका तथा कवयित्री मंदाताई पुरुषोत्तम देशमुख (६९) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पती प्राचार्य पी. एल. देशमुख, सुन, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ‘पुढचे पाऊल’, ‘नक्षलविश्वाची गोंड राणी’ या त्यांच्या कांदबऱ्या वाचकप्रिय ठरल्या. अलिकडेच त्यांच्या कथेवर पुण्यात ‘तालीम’ ही शॉर्ट फिल्म प्रकाशित झाली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या त्या आजीव सभासद आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईच्या पाच वर्षे अध्यक्ष होत्या.जुलै महिन्यात झालेल्या मसापच्या ७ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. पण आजारामुळे त्या येऊ शकल्या नव्हत्या.

Web Title: Demographer Mandatai Deshmukh passed away

टॅग्स :Beedबीड