तारा दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:24+5:302021-03-13T04:58:24+5:30
नियमांची अवहेलना केज : शहर व परिसरात वाहनचालकांकडून सातत्याने नियमांची अवहेलना सुरू आहे. दुचाकी वाहने व अॅाटोरिक्षा सर्रास वाहतुकींच्या ...

तारा दुरुस्तीची मागणी
नियमांची अवहेलना
केज : शहर व परिसरात वाहनचालकांकडून सातत्याने नियमांची अवहेलना सुरू आहे. दुचाकी वाहने व अॅाटोरिक्षा सर्रास वाहतुकींच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र सर्रास पाहायला मिळते. कडक निर्बंधाची मागणी आहे.
खड्डे बुजवावेत
बीड : तालुक्यातील चौसाळा गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांमधून खड्डे बुजविण्याची मागणी वारंवार होत आहे. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
कचऱ्याचे ढिगारे पडून
माजलगाव : शहरातील नवीन बसस्थानक सभोवती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. दुर्गंधीचा त्रास येथील नागरिकांना करावा लागतो. परिणामी डासांचे प्रमाण वाढत आहे.
पार्किंग कोलमडली
माजलगाव : शहरातील प्रमुख मार्गावरील पार्किंग व्यवस्था कोलमडली असल्याने कोंडी होत आहे. या कोंडीमुळे अनेकवेळा वाहनधारकांना पंधरा-पंधरा मिनिट कोंडीत अडकून पाडावे लागत आहे.