पेठेत पथदिवे सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:46+5:302021-07-02T04:23:46+5:30

कापूस, तूर लागवडीची लगबग शिरूर कासार : सध्या तालुक्यात पाऊस झाल्याने कापूस, तूर लागवडीची लगबग सुरू आहे. रेघा टाकून ...

Demand to start street lights in Peth | पेठेत पथदिवे सुरू करण्याची मागणी

पेठेत पथदिवे सुरू करण्याची मागणी

कापूस, तूर लागवडीची लगबग

शिरूर कासार : सध्या तालुक्यात पाऊस झाल्याने कापूस, तूर लागवडीची लगबग सुरू आहे. रेघा टाकून बी टोकण पद्धतीने शेतकरी लागवड करीत आहेत. बाजरी, मुगाची पेरणीही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. एकंदरीत शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त दिसत आहे.

राडी-मुडेगाव रस्त्यावर खड्डे

अंबाजोगाई : आठ महिन्यांपूर्वीच राडी ते मुडेगाव या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण केले होते. शासनाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, काम करणाऱ्या कंत्राटदाराने या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता कंत्राटदारांच्या माध्यमातून पुन्हा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी

बीड : नगर परिषदेकडून शहराला अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहराच्या काही भागात तीन दिवसाआड, तर काही भागात बारा ते पंधरा दिवसाआड आणि तेही तीन ते चार तास याप्रमाणे पाणीपुरवठा होतो. शहरात होणारा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Demand to start street lights in Peth