विद्यार्थ्यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:21 IST2021-02-05T08:21:47+5:302021-02-05T08:21:47+5:30
: धारूर तालुक्यातील चोरांबा, आरणवाडी व थेटेगव्हाण येथील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बससेवा नसल्याने त्यांची अडचण होत आहे. त्यामुळे तत्काळ जादा ...

विद्यार्थ्यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी
: धारूर तालुक्यातील चोरांबा, आरणवाडी व थेटेगव्हाण येथील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बससेवा नसल्याने त्यांची अडचण होत आहे. त्यामुळे तत्काळ जादा बससेवा सुरू करावी, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे.
तालुक्यातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातून चोरांबा, आरणवाडी, थेटेगव्हाण येथून धारूर येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बससेवा नसल्याने त्यांची अडचण होत आहे. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्वतंत्र जादा बससेवा सुरू करावी व त्यांची होणारी गैरसोय तत्काळ दूर करावी, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर एस. एच. चव्हाण, सटवा अंडील, राहुल चव्हाण, अमर चव्हाण, विठ्ठल मुळे, सुरज चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.